घरच्या घरी छोटी टेस्ट करा आणि ५ मिनिटांमध्ये मिळवा ॲन्टीबाॅडीज काऊंट, कसं ते जाणून घ्या

नवीन टेस्टचा मार्ग (Antibody Test In 5 Minutes) समोर आला आहे. त्यामुळे तुम्हाला ५ मिनिटांत समजेल की, लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात किती ॲन्टीबाॅडीज (Antibodies) तयार झाल्या आहेत.

    मुंबई:कोरोना प्रतिबंधक लस(Corona Vaccine) घेतल्यानंतर तुमच्या शरीरात ॲन्टीबाॅडीज तयार झाल्या आहेत की, नाही हे तपासण्यासाठी आता नवीन टेस्टचा मार्ग (Antibody Test In 5 Minutes) समोर आला आहे. त्यामुळे तुम्हाला ५ मिनिटांत समजेल की, लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात किती ॲन्टीबाॅडीज (Antibodies) तयार झाल्या आहेत.

    यासाठी फक्त रक्ताची चाचणी घेण्यात येत आहे. ज्यामध्ये ॲन्टीबाॅडीजच्या प्रमाणाबद्दल अचूक माहिती दिली जाईल. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची आवश्यकता नाही. फक्त रक्त देऊन आणि चाचणी कार्डवर दोन थेंब रक्ताचे ठेऊन ही टेस्ट केली जाते. या टेस्टचा शोध नुकताच वैज्ञानिकांनी लावला ज्यामध्ये फ्यूजन प्रोटीन मिसळले जातात. हे फ्यूजन प्रोटीन रक्ताच्या थेंबाद्वारे त्वरित ॲन्टीबाॅडीज आहेत की, नाहीत हे समजते.

    खरेतर या ॲन्टीबाॅडीजचे फारच लहान कण आहेत जे वायरल इन्फेक्शन शोधल्यानंतर तयार होतात. ॲन्टीबाॅडीजचे प्रोटीन हे कोरोना विषाणू विरूद्धच्या लढ्यासाठी तयार असतात. या टेस्टचा रिपोर्ट तुम्हाला केवळ ५ मिनिटांत मिळतो. हे आपण घरच्या घरी सहजपणे चेक करू शकतो. या टेस्टवरून तुम्ही जर कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल तर ती लस प्रभावी आहे हे कळते आणि लस घेतल्यानंतर शरीरात किती ॲन्टीबाॅडीज तयार झाल्या आहेत हे सुद्धा समजते.

    हे टेस्ट कार्ड अमेरिकेतील जाॅन हाॅपकिन्स विद्यापीठाने तयार केले आहे. ज्यांनी लस घेतली नाही, परंतु त्यांना कोरोना संसर्ग झाला होता ते सुद्धा ही टेस्ट करू शकता.

    एलिसा टेस्टद्वारे देखील ॲन्टीबाॅडीज शोधण्याचे काम केले जाते. मात्र त्याचा रिझल्ट यायला कित्येक तास लागतात. या टेस्टचा रिझल्ट केवळ ५ मिनिटांत येतो. ज्या लोकांमध्ये ॲन्टीबाॅडीजचे प्रमाण कमी असेल तर ते बूस्टर डोससुद्धा घेऊ शकतात. असेही काही लोकं असू शकतात, ज्यांना लसीचा काही परिणाम होत नाही. अशा लोकांना ॲन्टीबाॅडीज चाचणी करणे आवश्यक आहे. त्यावरून ॲन्टीबाॅडीज त्यांच्या शरीरात कार्यरत आहेत की, नाही हे समजण्यास मदत होते.

    वैद्यकीय तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, ॲन्टीबाॅडीज टेस्ट करणे फार महत्त्वाचे नाही आणि अशा ॲन्टीबाॅडीज टेस्टने हे कळू शकते की, यापूर्वी कोणत्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला.

    कोरोनापासून वाचण्यासाठी ॲन्टीबाॅडीज टेस्टमध्ये आढळले, तर लोकं कोरोना प्रतिबंधक लस घेणार नाही आणि हे भविष्यात धोकादायक ठरू शकते. शरीरात ॲन्टीबाॅडीजचे प्रमाण समजल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तिची हमी आहे. कारण आपल्या शरीरात असे बरेच घटक आहेत जे ॲन्टीबाॅडीजसारखे संरक्षण देतात.