अँटिलिया स्फोटक प्रकरण: अर्धाडझन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक, राजकीय संरक्षणामुळेच ‘मास्टरमाईंड’ मोकाट!

अँटिलिया स्फोटक प्रकरण, हिरेन मनसुख खून आणि सचिन वाझे व त्याच्या टोळीचा छडा कोणी लावला असेल तर तो एटीएसने. या एटीएसचे प्रमुख होते जयजीतसिंह. ते आता ठाण्याचे पोलिस आयुक्त आहेत. ते आता परमबीर सिंह विरोधात दाखल असलेल्या दोन एफआयआरचा तपास करीत आहेत. अँटिलिया स्फोटक प्रकरणात परमबीरही गोत्यात आले आहेत हे विशेष. जयजितसिंह हे तंत्रज्ञानाचे विशेष जाणकारही आहेत. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी ते एटीएसमध्ये होते. ते जर एटीएसमध्ये नसते तर वाझे आणि त्याच्या टोळीचे कारनामे कदाचित उघडही झाले नसते.

  मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात अर्धाडझन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणाच्या मास्टरमाईंडला राजकीय संरक्षण असल्यामुळेच तो मोकाट आहे. हे प्रकरण एनआयएकडे असले तरी या प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव एटीएसलाही माहित असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण जर एटीएसकडे असते तर हा मास्टरमाईंड आजपर्यंत एटीएसच्या कोठडीत असता, अशीही चर्चा आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. या प्रकरणात निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे सारिपटावरील केवळ ‘प्यादा’ असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा सर्वप्रथम उलगडा एटीएसनेच केला होता.

  अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच वाझे टोळीचा छडा

  अँटिलिया स्फोटक प्रकरण, हिरेन मनसुख खून आणि सचिन वाझे व त्याच्या टोळीचा छडा कोणी लावला असेल तर तो एटीएसने. या एटीएसचे प्रमुख होते जयजीतसिंह. ते आता ठाण्याचे पोलिस आयुक्त आहेत. ते आता परमबीर सिंह विरोधात दाखल असलेल्या दोन एफआयआरचा तपास करीत आहेत. अँटिलिया स्फोटक प्रकरणात परमबीरही गोत्यात आले आहेत हे विशेष. जयजितसिंह हे तंत्रज्ञानाचे विशेष जाणकारही आहेत. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी ते एटीएसमध्ये होते. ते जर एटीएसमध्ये नसते तर वाझे आणि त्याच्या टोळीचे कारनामे कदाचित उघडही झाले नसते. जयजितसिंह यांच्या प्रयत्नामुळेच एटीएसच्या कॉल इंटरसेप्ट सेलमध्ये जगातील अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत.

  आज महाराष्ट्र एटीएसचे इंटरसेप्ट सेल आयबी आणि रॉ पाठोपाठ उत्कृष्ट मानले जाते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांचे कॉल्स महाराष्ट्र एटीएसनेच इंटरसेप्ट केले होते.

  आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा तपास गुन्हे शाखेने केला असला तरी या प्रकरणात कॉल इंटरसेप्ट करण्याची जबाबदारी एटीएसलाच सोपविण्यात आली होती.

  2006 मधील औरंगाबाद शस्त्र प्रकरणाचाही जयजितसिंह यांनी तपास केला. या प्रकरणात जैबुद्दीन अन्सारी नामक आरोपी फरार होता तो पाकिस्तानात पळून गेला होता. 2006 मध्ये मुंबईत झालेल्या लोकल बॉम्बस्फोट प्रकरणाचाही तपास जयजितसिंह यांनी केला होता. त्यानंतर ते काही वर्षेपर्यंत दिल्लीत प्रतिनियुक्तीवर गेले होते.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]