अँटालिया स्फोटकं प्रकरण : सचिन वाझेला ‘वोकहार्ट’ रूग्णालयात उपचार घेण्यास परवानगी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

    मुंबई – अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील `वोकहार्ट’ या खासगी रूग्णालयात दाखल होण्याची परवानगी गुरूवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने दिली आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

    तळोजा कारागृहात असलेल्या वाझे यांने ह्रद्याच्या संबंधित त्रास असल्याने न्यायालयाच्या परवानगी नंतर ३० ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्याकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीय करण्याची गरज निर्माण झाल्याने मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात वैद्याकिय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अर्जातून करण्यात आली होती.

    त्या अर्जावर गुरूवारी न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, सरकारी पक्षाकडून वाझेच्या अर्जाला विरोध करण्यात आला नाही. त्यामुळे न्यायालयाने वाझे यांना मुंबईच्या ‘वोकहार्ट ‘ रूग्णालयात सशर्त उपचार घेण्याची परवानगी दिली. तसेच यादरम्यान त्यांच्या पत्नीलाही रूग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची मुभा न्यायालयाक़डून देण्यात आली आहे.