प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे
प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे

एंटीलियास आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणाची चैकशी करणाÚया राष्ट्रीय तपास एजन्सीने सचिन वाझे प्रकरणातील माजी एसीपी आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी शर्मा यांची बुधवारी जवळपास 8 तास चैकशी करण्यात आली. हिरेन हत्याकांड प्रकरणात एनआयएद्वारे ही तपासणी केली जात आहे.

  मुंबई (Mumbai).  एंटीलियास आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणाची चैकशी करणाÚया राष्ट्रीय तपास एजन्सीने सचिन वाझे प्रकरणातील माजी एसीपी आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी शर्मा यांची बुधवारी जवळपास 8 तास चैकशी करण्यात आली. हिरेन हत्याकांड प्रकरणात एनआयएद्वारे ही तपासणी केली जात आहे. यामध्ये प्रदीप शर्मा यांना सचिन वाझे यांच्या कटकारस्थानाविषयी काही माहिती होती का? याचीही चैकशी करण्यात येत आहे.

  एनआयएला वझे यांच्या बॅंक खात्यामध्ये 1.5 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. यावर साॅलिस्टिर जनरल अनिल सिंग यांनी बुधवारी एनआयए कोर्टला आपले उत्तर दिले आहे. यात स्वतःला प्रामाणिक असल्याचे सांगणाÚया सचिन वाझे याच्या अकाउंटमध्ये इतकी मोठी रक्कम मिळणे ही बाब संशय निर्माण करणारी असल्याचे सांगण्यात आले. वझे यांच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली, याची चैकशी करण्यासाठी वझे यांची पोलिस कस्टडी वाढवून देण्यात याची अशी मागणी एनआयएद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.

  मनसुख हिरेन एंटिलियसमध्ये सामील होते
  सॉलिसिटर जनरल ने न्यायालयास सांगितले की, सुरुवातीच्या तपासात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया नामक घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ उभी करण्याच्या प्रकरणात मनसुख हिरेन सामील असल्याचे आढळले. एनआयच्या माहितीप्रमाणे, मनसुख याने पैशाच्या हव्यासापोटी सचिन वाझे याला या प्रकरणात सहभागी करून घेतले. वाझे यांच्या दाव्यानुसार मनसुख यांनी त्यांच्या मर्जीनेच स्काॅर्पिओची चाबी त्यांना दिली होती.

  मनसुख सर्वांत कमजोर कडी
  एनआयए सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख यांची सतत चैकशी केली जात असल्याने ते त्रस्त झाले होते. ते या प्रकरणातील सर्वांत कमकुवत कडी बनले होते. यानंतर 2 आणि 3 मार्च दरम्यान सचिन वाझे यांनी मनसुख यांना प्लानमधून हटविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे विनायक शिंदे यांच्यासह काही लोकांना सोबत घेऊन 4 मार्चच्या रात्री मनसुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे साॅलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले आहे.