Anuradha Poudwals son Aditya passes away at the age of 35 years
आदित्य पौडवाल याचं वयाच्या ३५ व्या वर्षी निधन

  • म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड आणि भजन गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Poudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Poudwal) याचं वयाच्या अवघ्या ३५ व्या निधन (passes away) झाल्याची बातमी समोर आली आहे. आदित्यच्या किडनी निकामी (kidneys failure) झाल्याने त्याचं निधन झाल्याचं समजतं. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

२०२० या वर्षात बॉलिवूडमधून अनेक वाईट बातम्या समोर आल्या. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान आणि सुशांत सिंह राजपूतसहीत अनेक कलाकारांचं निधन झालं. अशातच आदित्य पौडवालच्या निधनाची बातमी आली. शनिवारी सकाळी आदित्यचं निधन झालं. त्याच्या किडनी निकामी झाल्याने इतक्या कमी वयात त्याचं निधन झाल्याची माहिती आहे.

आदित्य हा म्युझिशियन होता. त्याचं नाव भारतातील सर्वात कमी वयाचा म्युझिशियन म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स (Limca Book of Records) मध्ये नोंदवलं गेलं होतं. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती. आदित्यने आई अनुराधा पौडवालसोबत काही भजनेही गायली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचं पालन करत मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.