anurag kashyap-payal ghosh

अनुरागने कट असल्याचे बोलून लैंगिक शोषणाचा आरोप फेटाळून लावला. त्याला शांत करण्यासाठी हे सर्व घडत असल्याचे त्याने ट्विट केले आहे. पायल घोषला प्रत्युत्तर देताना अनुराग कश्यप यांनी एकूण चार ट्विट केले.

मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. परंतु अनुरागने यावर भाष्य करताना हा आपल्यावरील कट असल्याचे बोलून लैंगिक शोषणाचा ( sexual harassment) आरोप फेटाळून (denies allegations) लावला. त्याला शांत करण्यासाठी हे सर्व घडत असल्याचे त्याने ट्विट केले आहे. पायल घोषला प्रत्युत्तर देताना अनुराग कश्यप यांनी एकूण चार ट्विट केले आणि म्हटले की, “तुमचे जे आरोप आहेत ते सर्व निराधार आहेत”. असे त्याने म्हटले आहे.


या ट्वीटनंतर कश्यपने दुपारी २.४२ वाजता आणखी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी थेट सांगितले की येत्या काही दिवसांत त्याच्यावर आणखी बरेच हल्ले होतील. त्याने लिहिले, ‘त्याची वाट बघतोय’.


यापूर्वी अभिनेत्री पायल घोष यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपवर खूप गंभीर आरोप केला होता. तिने ट्विटरवरही ४-५ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा खुलासा केला होता. आपल्या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत कारवाई करण्याचे आवाहन केले. तिच्या ट्वीटवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दखल घेतली आणि घटनेची सविस्तर माहिती तिला विचारली.