यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

13 राज्यातील 17 हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या 130 करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास 11.5 करोड आणि राज्य 29 आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील, असं निलेश राणे म्हणाले आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केल आहे. त्यामध्ये त्यांनी या सर्वेक्षणामधील सॅम्पल साइजच्या आकडेवारीची माहितीही शेअर केली आहे.

  मुंबई : प्रश्नम या संस्थेकडून देशातील एकूण 13 राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी संदर्भात जनतेचं मत जाणून घेण्यासाठी एक सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अव्वल ठरले आहेत. यानंतर त्यांचं कौतुक केलं जात आहे.

  परंतू विरोधी पक्षनेत्यांनी या मुद्यावरून त्यांच्यावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाबद्दल आपण समाधानी असून पुन्हा त्यांना मतदान करु असं म्हणणाऱ्यांची संख्या 49 टक्के इतकी आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

  निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

  दरम्यान 13 राज्यातील 17 हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या 130 करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास 11.5 करोड आणि राज्य 29 आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

  यासंदर्भात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केल आहे. त्यामध्ये त्यांनी या सर्वेक्षणामधील सॅम्पल साइजच्या आकडेवारीची माहितीही शेअर केली आहे. त्यामध्ये या सर्वेक्षणामध्ये एकूण 13 राज्यान मिळून 17,500 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामधील 49 टक्के लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगिरी चांगली असल्याचं म्हटलं असल्याचं लिहिलं आहे.

  दरम्यान, या सर्वेमध्ये ‘प्रश्नम’संस्थेकडून बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश करण्यात आला होता.