महिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना

पीडित महिला मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावर एका खाजगी बँकेत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख झाली होती. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर दोघांत मैत्री वाढत गेली. कालांतराने यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं.

    Mumbai Rape Case मुंबई : मुंबईतील (Woman) एका महिला पोलीस अधिकाऱ्याला (Woman Police Officer) ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार (Blackmail and Sexual Harassment Case) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला पोलीसानं मेघवाडी पोलिसांत गुन्हा नोंदवला (FIR lodged) आहे. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तीन आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    पीडित महिला मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावर एका खाजगी बँकेत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख झाली होती. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर दोघांत मैत्री वाढत गेली. कालांतराने यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं.

    लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ केला शूट

    दरम्यान आरोपी प्रियकर एकेदिवशी पीडित महिलेला चकाला येथे भेटायला आला होता. याठिकणी आरोपीनं पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडिओही शूट केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं अनेकदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे.

    न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच पीडित महिलेचं एका तरुणाशी लग्न ठरलं होतं. याची माहिती आरोपीला मिळताच त्यानं पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला याची माहिती देऊन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पीडितेला सतत ब्लॅकमेल करून अत्याचार करत होता. त्यामुळे पीडित महिला अधिकाऱ्यानं आरोपीच्या त्रासाला कंटाळून मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी पवई पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

    api woman police officer raped many times by blackmail crime in mumbai maharashtra