विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना दहा तरूण सनदी अधिका-यांची आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती

राज्य सरकारने दहा तरूण सनदी अधिका-यांच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती केल्या आहेत. त्या मध्ये शुभम गुप्ता यांची नियुक्ती गडचिरोली येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी या पदावर करण्यात आली आहे. तर श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती धुळे येथे प्रकल्प अधिकारी सहायक जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.

    मुंबई : राज्य सरकारने दहा तरूण सनदी अधिका-यांच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती केल्या आहेत. त्या मध्ये शुभम गुप्ता यांची नियुक्ती गडचिरोली येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी या पदावर करण्यात आली आहे. तर श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती धुळे येथे प्रकल्प अधिकारी सहायक जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.

    तळोदा नंदूरबार येथे डॉ माणिक घोष यांची प्रकल्प अधिकारी सहायक जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोलापूर येथे श्रीमती मनिषा आव्हाळे यांची प्रकल्प अधिकारी सहायक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आहेरी गडचिरोली येथे अंकीत यांची सहायक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नंदूरबार येथे श्रीमती मिनल करनवाल यांची सहायक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

    यवतमाळ जिल्ह्यात पुसद येथे सांवत कुमार यांची सहायक जिल्हाधिकारी त था प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास योजना येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावती येथील धारणी येथे वैभव वाघमारे यांची प्रकल्प अधिकारी सहायक जिल्हाधिकारी या पदावर आदिवासी विकास योजनेवर नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात देवरी येथेअनमोल सागर यांची नियुक्ती सहायक जिल्हाधिकारी त था प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास योजना या पदावर करण्यात आली आहे. तर श्रीमती आयुषी सिंग यांची नियुक्ती जव्हार आणि पालघर येथे प्रकल्प अधिकारी त था सहायक जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे.