…अखेर ‘या’ आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती

तुकाराम मुंढे यांना काल (१३ जानेवारी) चार अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाली. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांना मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात नियुक्ती मिळाली. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई: नागपूरमध्ये आयुक्त म्हणून काम करताना तुकाराम मुंढे यांनी कोणाचीही पर्वा न करता धडाक्याने निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. नागपूर शहराला आणि महापालिकेच्या प्रशासनाला तुकाराम मुंढे यांनी कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागपूर महापालिकेचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासन असा वाद निर्माण झाला होता. त्या वादामुळे अखेर मुंढे यांची बदली मुंबईत राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली होती. पण त्या ठिकाणची नियुक्ती प्रलंबित होती.

तुकाराम मुंढे यांना काल (१३ जानेवारी) चार अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाली. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांना मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात नियुक्ती मिळाली. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच महिन्यांपूर्वी नागपूरच्या महापालिका आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर कोणत्याही पदभाराविना असलेल्या तुकाराम मुंढे यांना अखेर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.