Municipal administration responsible for cyclone damage; BJP will file a petition

मुंबईत वेळेतच मान्सून दाखल होताच मुसळधार सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. दरवर्षी चक्रीवादळामुळे मुंबईलाहीप फटका बसत आहे. अलीकडेच ‘तौक्ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळाने मुंबईतील वातावरणात बदल झाला होता. वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता झाडांच्या संवर्धनासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  मुंबई : मुंबईत वेळेतच मान्सून दाखल होताच मुसळधार सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. दरवर्षी चक्रीवादळामुळे मुंबईलाहीप फटका बसत आहे. अलीकडेच ‘तौक्ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळाने मुंबईतील वातावरणात बदल झाला होता. वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता झाडांच्या संवर्धनासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  पालिकेने मुंबईत पायलेट प्रकल्पाची सुरूवात केली आहे. झाडांची देखभाल आणि निरीक्षण करण्यासाठी आर्बोरिस्ट नियुक्त केले आहेत. हे आर्बाेरिस्ट एकप्रकारचे झाडांचे डॉक्टर असतात. एक आर्बोरिस्ट झाडांचा व्यवस्थित अभ्यास करतो आणि झाडांची सध्याच्या परिस्थितीची तपासणी करतो.

  पायलेट प्रकल्पाच्या स्वरुपात पालिकेने दक्षिण मुंबईतील २०० हून अधिक झाडांसाठी आर्बोरिस्ट नियुक्त केला आहे. आर्बोरिस्ट वैभव राजे मािहती गोळा करेल आणि ही माहिती पालिकेला देणार आहे. गरज पडल्यावर त्या झाडांवर उपचारही केले जाणार आहेत. राजे यांनी सांगितले की, विविध उपकरणांनी झाडांची तपासणी केली जाते आणि त्याचे आकलन केले जाते. आर्बाेरिस्टशिवाय योग्य आकलन होऊ शकत नाही. आकलन करण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण रेस्टोग्राफ मशीन आहे. मशीनमध्ये एक सुई टाकली जाते आणि झाडाच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास केला जातो, असे त्यांनी सांिगतले.

  भारतासाठी आर्बाेरिस्ट हे नवीन आहे आणि शहरांसाठी फार महत्त्वाचे आहे. जेथे जास्त लोकसंख्या आहे, तेथे झाडे एकत्र असतात आणि त्यामुळे झाडांवर ताण जास्त वाढतो. झाडांची देखभाल आणि योग्य उपचार आवश्यक आहे.

  -वैभव राजे, आर्बाेरिस्ट
  हे सुद्धा वाचा