Eknath Khadse's apology; He had made a controversial statement about Brahmins while criticizing Fadnavis

राष्ट्रवादी पक्षात सहभागी होण्यापूर्वी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. दुसरीकडे, भोसरी येथील भूखंड घोटाळ्याचेही आरोप खडसेंवर आहेत. यामुळेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांची विधान परिषदेवर नियुक्ती न करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांना पत्रही लिहिले होते.

    मुंबई : महाराष्ट्र विधानस परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा गेल्या 9 महिन्यांपासून अधांतरी आहे. याबाबत मुंबई हायकोर्टाने विनंती केल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांच्या नियुक्त्यांची यादी रखडण्यामागे भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रेवश केलेले एकनाथ खडसे हेच मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.

    राष्ट्रवादी पक्षात सहभागी होण्यापूर्वी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. दुसरीकडे, भोसरी येथील भूखंड घोटाळ्याचेही आरोप खडसेंवर आहेत. यामुळेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांची विधान परिषदेवर नियुक्ती न करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांना पत्रही लिहिले होते.

    भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीने खडसेंच्या जावयाला अटक केली होती. याबाबत खडसे यांचीही चौकशी झाली आहे. त्यामुळेच राज्यपराल कोश्यारी खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास द्विधा मन:स्थितीत आहेत. खडसे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांचे नाव जर वगळले तर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या टीकेचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच राज्यपालांनी सध्या ‘सबुरी’ची भूमिका घेतली असल्याचे समजते.