Why are Mumbaikars throwing Rs 1,600 crore into the sea? BJP opposes desalination of sea water

राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? असा आमचा सवाल आहे. डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? असे सवाल करत शेलार यांनी मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यांवर घणाघात केला आहे.

    मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यानी मुख्यमंत्र्याच्या मंदीर बंदीच्या विधानाचा समाचार घेतला आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का ? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे असे शेलार यांनी म्हटले आहे.

    राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? असा आमचा सवाल आहे. डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का याच उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? असे सवाल करत शेलार यांनी मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यांवर घणाघात केला आहे.

    पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात.  कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का ? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत, मॉल मधल्या कामगारांच कारण सांगून माँल उघडे केलेत मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ, अगरबत्ती,  फुल विकणा-याचे पोट भरु शकत नाही का? यांच्याशी वाटाघाटी होउ शकत नाही कारण आमचा तो गरीव माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पुर्ण करणार? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.

    भक्तांची देवापासुन ताटातूट करण्याचा प्रयत्न म्हणून त्यांना बंदी त्यांच्यावर निर्बंध आणि डिस्को, पब, बार वाले वाटाघाटी करतील, आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भुमिका. आरोग्य केंद्र हवीच पण कट कमिशन नको  ही आमची भुमिका आहे. खरतर भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याच काम शिवसेना करतेय. मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहुन सुरु करु ही भुमिका नाही. भक्तांची देवापासुन ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणुन हा करोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देउळ बंदीच शिवसेनेच अभियान आहे अशी टिका त्यांनी केली.