कंत्राटदारांसाठी कोविड केंद्रे आहेत का ? किरिट सोमैय्यांचा सवाल ! 

कोविड केंद्र फक्त कंत्राटाच्या सोयी साठी सुरू करण्यात आली होती का याचे उत्तर महापालिका आणि सरकारने द्यावे- सोमैय्या

मुंबई: आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत भाजप उपाध्यक्ष किरिट सोमैय्या यांनी महापालिकेच्या डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरला भेट दिली.  तेथे वार्डबॉय, आया, नर्सेसचे आर्थिक शोषण केले जाते. तीन महिन्यांचा पगार नाही. स्वाक्षरी दरमहा १५ हजार साठी घेतली जाते, पण पगार मात्र दरमहा फक्त दहा हजार दिले जाते असा आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे सरकार आणि कल्याण डोंबिवली महापालिका अशा कंत्राटदारांचे समर्थन करत आहेत, लाड का करत आहे. असा सवाल त्यांनी केला आहे ते म्हणाले की, ही कोविड केंद्र फक्त कंत्राटाच्या सोयी साठी सुरू करण्यात आली होती का याचे उत्तर महापालिका आणि सरकारने द्यावे.