गुन्हेगारांना वाचवण्याची जबाबदारी घेणार आहात का? अनिल परबांचा भाजपला थेट सवाल

महाराष्ट्रात जर कुणी कुणाचा खून केला, कुणी आत्महत्येला प्रवृत्त केले, कुणी अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची नाही का? असे जर म्हणणे असेल तर भाजपने स्पष्ट सांगावे. किंवा तुम्ही याची जबाबदारी घेणार आहात का?  गुन्हेगारांना वाचवण्याची जबाबदारी घेणार आहात का?  ते देखील  सांगा असे म्हणत परब यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.

मुंबई :  अन्वय नाईक आत्महत्या आणि कंगना रनौत कार्यालयावर तोडकाम प्रकरणावरुन आज हिवाळी अधिवेशात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. हे प्रकरण न्यायालयात आहे त्यावर चर्चा करू नको, असा आक्षेप सत्ताधार्‍यांनी घेतला. यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. त्याच्या टीकेला परिवहन मंत्री तथा शिवसेना आमदार अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

ज्या कलमाखाली कारवाई करायची होती, ते सुप्रीम कोर्टाने याचिकेत सांगितले आहे. ३६४ जर चुकीची कारवाई असेल तर ३५१ मध्ये कारवाई करा असे आदेश कोर्टाने दिले आहे. आधी याचिका नीट वाचा असा टोला परब यांनी लगावला.