अर्णब गोस्वामी, कंगनाविरोधात हक्कभंग, सुपारीबाज रिपब्लिक पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी

रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही शोदरम्यान मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा एकेरी नावाने उल्लेख केला आणि त्यांच्या अवमान करण्यात आला.

मुंबई : कंगना रणौतने मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर केल्यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही शोदरम्यान मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा एकेरी नावाने उल्लेख केला आणि त्यांच्या अवमान करण्यात आला. यामुळे अशा सुपारीबाज, टिनपाट पत्रकाराविरोधात हक्कभंगाची कारवाई करा अशी मागणी करणारा प्रस्ताव काल विधीमंडळात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला.

तसेच विधना परिषदेत भाई जगताप आणि मनीषा कायंदे यांनीही अर्णब गोस्वामी, कंगना रणौत हीच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. दोन्ही सभागृहांत ह्या प्रस्तावास स्वीकारण्यात आले आहे. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपाध्यक्ष व उपसभापती यांनी दिले आहे. परंतु विधानसभेत मात्र भाजप सदस्यांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले होते.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाची कारवाईची मागणी केली. यावर भाजप सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार अनिल परब यांनी अर्णब गोस्वामी स्वतःला न्यायाधीश समजत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा एकेरी उल्लेख केला आहे. तसेच कुणाची तरी सुपारी घेऊन हा टीनपाट पत्रकार जनतेचा अपमान करीत आहे. असे म्हणाले यावर भाजपा सदस्यांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज १० मिनीट तहकूब करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज पूर्ववत झाल्यानंतर छगन भुजबळ हक्कभंगाच्या प्रस्तावावर बोलण्यास उभे राहिले असाताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवर चर्चेची मागणी केली. यावेळी पुन्हा गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा आर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. तसेच पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर छगन भुजबळ पुन्हा हक्कभंगाविषयी बोलताना आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या तपासाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी भाजप सदस्यांनी गोंधळ घातल्याने कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.

कंगनाची महाराष्ट्रसोबत गद्दारी

मुंबईच्या बाबतीत कंगनाने जे वक्तव्य केले ते गंभीर आहे. येथे येऊन हे लोक स्वतःचे बंगले उभे करतात. कंगनाने महाराष्ट्रासोबत आणि मुंबईसोबत गद्दारी केली आहे. असा आरोप केला. मनीषा कायंदे यांनी अर्णव यांच्याविरोधात हक्कभंग मांडताना जाणूबुजून अर्णब गोस्वामी हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा अवमान करत आहेत. सरकारविरोधात मीडिया ट्रायल चालवला जात आहे. यामुळे त्यांच्यावर हक्कभंग स्वीकारण्याची मागणी केली. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा हक्कभंग कसा होतो, असे सवाल उपस्थित केला. त्यावर उपसभापतींनी हा प्रस्ताव माझ्याकडे आल्याने मी त्यांना बोलायची संधी देत असल्याचे सांगितले.