Supreme Court reassures Arnab Goswami; Order the police to execute immediately

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जोर का झटका दिला आहे. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे तसेच तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी  मागणी त्यांनी या याचिकेद्वेरी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याची सुनावणी झाली. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जावू शकतो असेही न्यायालयाने यावेळी सूचीत केले.

दरम्यान, रायगड पोलिसांनी अलिबाग न्यायलयात दाखल केलेल्या १९१४ पानी आरोपपत्रात पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.