Arrangements will be made to prevent depression among students; MPSC will speed up the recruitment process

पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर सरकारला खडबडून जागी आली आहे. अधिवेशनात राज्य लोकसेवा आयोगाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारली जाणार आहे. अधिवेशात हा निर्णय घेण्यात आला.

    मुंबई : पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर सरकारला खडबडून जागी आली आहे. अधिवेशनात राज्य लोकसेवा आयोगाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारली जाणार आहे. अधिवेशात हा निर्णय घेण्यात आला.

    लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत एसईबीसीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा आता ४३ वर्षापर्यंत वाढविली. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी मध्ये सवलत देण्याचाही निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

    ‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरली जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरु केली जाणार आहे.

    महाराष्ट्र आयोगामार्फत लवकरच १५ हजार ५१५ वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे भरली जाणार आहेत.‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया गतीमान केली जाणार आहे. एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.