kangana

पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार असून, कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असली तरी पुढील सुनावणी होण्याआधी कंगनाला बहिणीसमवेत मुंबई पोलिसांसमोर हजर व्हायचे आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कंगनाला अटक करू नये असे आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे.

कंगणाने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने  ८ जानेवारीपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश कंगना आणि तिच्या बहीणील दिले आहेत. त्याचबरोबर, कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेलवर तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी एफआयआर संदर्भात युक्तिवाद मांडतान ‘कंगना रनौत आणि रंगोली चंडेल कुठलेही वादग्रस्त भाष्य करणार नाही’, असे विधान केले. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होणार असून, कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असली तरी पुढील सुनावणी होण्याआधी कंगनाला बहिणीसमवेत मुंबई पोलिसांसमोर हजर व्हायचे आहे.

का झाला कंगना विरोधात गुन्हा दाखल?

कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य या प्रकरणी कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. या वक्तव्याप्रकरणी कंगना विरोधात दाखल झालेल्या याचिकेनंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. .

अशी टाळली कंगनाने अटकेची कारवाई

२३ नोव्हेंबर रोजी कंगनाला वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, यावेळीही अनुपस्थितीत राहत कंगनाने हायकोर्टाचे दरवाजा ठोठावला. वांद्रे पोलीस स्टेशनमधील एफआयआर रद्द करण्याची मागणी तिने उच्च न्यायालयाकडे केली. कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, कंगना अनुपस्थितीत राहिल्याने तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळेच तिने उच्च न्यायालयात धाव घेतली.