छत्रपती संभाजी राजेंना अटक करा, अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

कोरोना काळात गर्दी जमवण्यास बंदी असताना संभाजी राजे यांनी मोठ्या संख्येने लोकांना जमा केल्याचा आरोप अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

    नांदेड येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाचे आयोजक आणि खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांना अटक करा अशी मागणी ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याकडे मागणी केली आहे. कोरोना काळात गर्दी जमवण्यास बंदी असताना संभाजी राजे यांनी मोठ्या संख्येने लोकांना जमा केल्यामुळे आयोजकांवर आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.