सप्टेंबरच्या पुढील सुनावणीत गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट : न्या चांदिवाल आयोगाचा परमबीर सिंग यांना इशारा

पुढील सुनावणीस सिंग हजर राहिले नाहीतर त्यांच्या अटकेचे वॉरंट निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान सध्या राज्य गृहरक्षक दलात सेवेत असलेले परमबीर सिंग आजारपणाच्या सुटीवर होते.

    मुंबई (Mumbai): थेट राज्याच्या गृहमंत्र्यावर (the state Home Minister,) शंभर कोटी रूपये वसुलीचे आरोप करुन खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी सातत्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणा-या न्या चांदीवाल आयोगापुढे (the Chandiwal Commission) साक्ष देण्यास येणे टाळले. त्यामुळे आता ७ सप्टेंबर या पुढील तारखेला गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढले जाईल असा इशारा न्या चांदिवाल आयोगाने दिला आहे.

    चौथ्यांदा परमबीर गैरहजर (Parambir absent for the fourth time)
    पोलीस दलातून निलंबीत करण्यात आलेले पो. निरिक्षक सचिन वाझे यांना ऍंन्टालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सध्या केंद्रीय पोलीसांच्या ताब्यात आहेत. त्यांचाही जबाब न्यायालयीन आयोगाने नोंदवून घेतला आहे. परमबीर सिंग यांना आयोगाने चौकशीसाठी आज चौथ्यांदा सुनावणीची तारीख दिली होती मात्र ते हजर राहिले नाहीत.

    परमबीर सिंग आजारपणाच्या सुटीवर (Parambir Singh on sick leave)
    प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ असल्याने न्यायालयीन चौकशीची गरजच नसल्याचा आभिप्राय त्यांच्या वकिलांमार्फत सिंग यानी पूर्वीच आयोगाकडे नोंदविला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुढील सुनावणीस सिंग हजर राहिले नाहीतर त्यांच्या अटकेचे वॉरंट निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान सध्या राज्य गृहरक्षक दलात सेवेत असलेले परमबीर सिंग आजारपणाच्या सुटीवर होते. मात्र त्यांची सुटी संपली असून त्यानी नव्याने सुटी करिता अर्ज दाखल केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.