‘मी भाजपचा कार्यकर्ता, देशाच्या फायद्याचा विचार करून मी तिथं हजर होतो’ NCB सोबत उपस्थित त्या भाजप पदाधिकाऱ्याची प्रतिक्रीया

"मी भाजपचा कार्यकर्ता आहे. कुठेही देशविघातक काम होत असेल तर ते रोखा असे आम्हाला संस्कार आहेत. केवळ देशाच्या फायद्याचा विचार करून मी त्या ठिकाणी हजर होतो. मी रेड टाकली नाही फक्त मी अधिकाऱ्यांसोबत गेलो." असं भाजप उपाध्यक्ष मनिष भानुशाली यांनी म्हटलं आहे.

    NCB ने मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर टाकलेल्या छाप्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब लमिक यांनी NCB वर काही गंभीर आरोप केले. सोबतच मंत्री मलिक यांनी ‘भाजपचा कार्यकर्ता मनिष भानुशाली यानेच ही कारवाई केली असून एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. याला आता मनिष भानुशाली यांनी उत्तर दिलं आहे.

    मनिष म्हणाले की, ‘नवाब मलिक यांनी दाखवलेल्या फोटोत दिसणारी व्यक्ती मीच आहे. मी फक्त माझ्याकडे जी माहिती आहे ती एनसीबीली दिली. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. कुठेही देशविघातक काम होत असेल तर ते रोखा असे आम्हाला संस्कार आहेत.’

    “केवळ देशाच्या फायद्याचा विचार करून मी त्या ठिकाणी हजर होतो. मी रेड टाकली नाही फक्त मी अधिकाऱ्यांसोबत गेलो. क्रूझवर एक पार्टी होणार आहे अशी माहिती माझ्या हाती आली तेव्हा मी ती एनसीबीला दिली. माझं स्टेटमेंट घ्यायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो.’ असं स्पष्टीकरण मनिष भानुशाली यांनी दिलं आहे. ABP माझ्या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे.

    काय म्हणाले होते मंत्री नवाब मलिक?

    नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एसीबीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता मनिष भानुशाली यानेच ही कारवाई केली असून एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असे सांगत भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला होता.