क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी, शाहरुखकडून नामांकित वकील करणार युक्तीवाद

आर्यनला आजतरी जामीन (Bail) मिळावा यासाठी शाहरुख खानने (Sharukh Khan) मुंबईतील नामांकित वकील अमित देसाई (Lawyer Amit Desai) यांना हायर केले आहे. अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे हे एकत्र आज कोर्टात आर्यनची बाजू मांडणार आहेत. हिट एन्ड रन केसमध्ये (Hit and Run Case) याच अमित देसाई यांनी २००२ साली सलमान खानला (Salman Khan) दिलासा मिळवून दिला होता.

  मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case), शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्याजामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात (एनडीपीएस कोर्ट) सुनमावणी होणार आहे. क्रुझवरील ड्रग्जच्या प्रकरणात आर्यन सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याचा मुक्काम सध्या आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Prison) आहे.

  आर्यनला आजतरी जामीन (Bail) मिळावा यासाठी शाहरुख खानने (Sharukh Khan) मुंबईतील नामांकित वकील अमित देसाई (Lawyer Amit Desai) यांना हायर केले आहे. अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे हे एकत्र आज कोर्टात आर्यनची बाजू मांडणार आहेत. हिट एन्ड रन केसमध्ये (Hit and Run Case) याच अमित देसाई यांनी २००२ साली सलमान खानला (Salman Khan) दिलासा मिळवून दिला होता.

  दुसरीकडे आर्यन खानला अटक करणारी एनसीबी आज सकाळी ११.३० च्या सुमारास कोर्टात आपले उत्तर दाखल करणार आहे. यानंतर लंचब्रेकनंतर दुपारी २.४५ च्या सुमारास आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महानगरदंडाधिकाऱ्यांनी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यनसह २० जणांना अटक केली आहे, त्यात २ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

  एनसीबी करणार जामीनाला विरोध

  ११ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीवेळी एनसीबीने कोर्टाकडून एका आठवड्याची मुदत मागून घेतली होती. कोर्टाने एनसीबीला बुधवार म्हणजेच जपर्यंतचा वेल दिला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंनी सांगितले की, हे प्रकरण एका निष्कर्षावर पोहचावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आमची बाजू भक्कम आहे, ती आम्ही कोर्टासमोर मांडू. या प्रकरणात अटक झालेल्या काही आरोपींसमोर आर्यनला बसवून त्यांची चौकशी करण्याचा एनसीबीचा मानस आहे, हे कोर्टाला सांगून आर्यनच्या जामिनाला एनसीबी कोर्टात विरोध करण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

  जेलमधील सहावा दिवस

  गोव्याला चाललेल्या कॉर्डिलिया क्रुझवर छापा घातल्यानंतर, एनसीबीने ३ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक केली होती. त्यानंत आर्यन खानला न्यायालयीन कोठडी मिळाली, ८ ऑक्टोबरपासून आर्यन आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यनकडे एनसीबीला ड्रग्ज मिळाले नव्हते, पण शौक म्हणून ड्रग्ज घेत असल्याची कबुली आर्यनने दिली होती. त्याचा मित्र अरबाजच्या बुटांमध्ये चरस लपविण्यात आल्याचेही समोर आले होते.