आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता, जामीन मिळणार?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना एक लग्जरी क्रूझवरील पार्टीमध्ये ड्रग रेड दरम्यान, ताब्यात घेतलं होतं. एनसीबीनं दावा केला होता की, या कारवाई दरम्यान, क्रूझवरुन अनेक वेगवेगळ्या ड्रग्स जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयात आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी शनिवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अद्याप सुनावणी निश्चित केलेली नाही. आर्यनसोबत पकडलेल्या अरबाज मर्चंटचे वकील आज सत्र न्यायालयात आपला जामीन अर्जही दाखल करणार आहेत. या दोघांशिवाय मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, इश्मीत सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल आणि नुपूर सतिजा यांच्या जामिनावर आज सुनावणी होऊ शकते.

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना एक लग्जरी क्रूझवरील पार्टीमध्ये ड्रग रेड दरम्यान, ताब्यात घेतलं होतं. एनसीबीनं दावा केला होता की, या कारवाई दरम्यान, क्रूझवरुन अनेक वेगवेगळ्या ड्रग्स जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने आणखी एका विदेशी नागरिकाला गोरेगाव येथून अटक केली आहे, रविवारी या प्रकरणात 20 वी अटक . तपास यंत्रणेने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त केले आहे. एनसीबीने सांगितले की, आरोपी नायजेरियाचा नागरिक आहे. त्याचे नाव ओकारो औजामा आहे. एनसीबीच्या मते, हे परदेशी नागरिक ड्रग्स प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासह, क्रूज ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 20 लोकांना अटक करण्यात आली आहे.

    दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस आलं होतं. आता पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. पालघरच्या दोन तरुणांनी किरण गोसावीविरोधात तक्रार दिली आहे. आर्यन खान प्रकरणामधील NCB ने ज्याला पंच केलाय,तोच पंच किरण गोसावी फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप पालघरमधील पीडित तरुणांनी केला आहे.