आर्यन खानच्या जामिनावरील अर्जावर आज सुनावणी, तुरुंगात मुक्काम वाढणार?

आज शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे आईच्या वाढदिवशी तरी आर्यन तुरुंगाबाहेर येईल की त्याचा तुरुंगातील आणखी मुक्काम वाढेल हे पाहावं लागणार आहे. सकाळी 11 वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणीस सुरुवात होईल.

  मुंबई : मुंबईत क्रूझवर ड्रग्स पार्टी दरम्यान एनसीबीनं छापेमारी केली. या कारवाईमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या अटक करण्यात आली. सध्या आर्यन खान तुरुंगात असून आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

  दरम्यान त्यात आज शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे आईच्या वाढदिवशी तरी आर्यन तुरुंगाबाहेर येईल की त्याचा तुरुंगातील आणखी मुक्काम वाढेल हे पाहावं लागणार आहे. सकाळी 11 वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणीस सुरुवात होईल.

  या आगोदर गुरुवारी न्यायालयानं आर्यन खान आणि इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी आर्यनच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती आर एम नेर्लीकर यांनी कोठडी वाढवण्याची एनसीबीची याचिका फेटाळून लावली. अस्पष्ट कारणास्तव कोठडी मंजूर केली जाऊ शकत नाही असं म्हणत न्यायालयाने सांगितलं की, जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होईल.

  गोव्याच्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक

  आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जेंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याच्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच जणांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आलं. तेथून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  9 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

  एनसीबीला आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवायचं होतं. एजन्सीने न्यायालयाला सांगितलं की त्याने आर्यन आणि मर्चंटच्या वक्तव्याच्या आधारे अचित कुमारला अटक केली आहे. एनसीबीने म्हटलं की, या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आरोपींना कुमारच्या समोर भेट घडवून आणणं गरजेचं आहे. कुमारला बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.