राज्यात १० हजार ६९७ इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर ३६० जणांचा मृत्यू

राज्यात ३६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३६० मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

    मुंबई: शनिवारी राज्यात १०,६९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,९८,५५० झाली आहे. शनिवारी १४,९१० रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण ५६,३१,७६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात ३६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ३६० मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

    यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १६०६ ने वाढली आहे. हे १६०६ मृत्यू, नाशिक-३१५, नागपूर-२७६, पुणे-२३०, सातारा-१४९, अहमदनगर-१३८, ठाणे-१२६, सांगली-४१, जालना-३६, रत्नागिरी-३४, धुळे-३०, नांदेड-२९, बुलढाणा-२८, पालघर-२७, लातूर-१९, रायगड-१९, सोलापूर-१६, यवतमाळ-१३, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-११, गोंदिया-९, जळगाव-८, परभणी-८, वर्धा-७, बीड-६, उस्मानाबाद-६, कोल्हापूर-५, सिंधुदुर्ग-३, अकोला-२, अमरावती-२ आणि भंडारा-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७८,३४,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,९८,५५० (१५.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६३,२२७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,८०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ७४९:

    मुंबईत दिवसभरात ७४९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७१४९६५ एवढी झाली आहे. तर १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५०९७ मृत्यूची नोंद करण्यात आली.