कल्याण डोंबिवलीत तब्बल ६२  नवीन रुग्ण  ;  कोरोना रुग्णांची संख्या १०९६

दोघांचा मृत्यूने मृतांची संख्या ३१ कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाने कहर केला असून आज देखील एकाच दिवशी तब्बल ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकीदोन जणांचा मृत्यू देखील

दोघांचा मृत्यूने मृतांची संख्या ३१


कल्याण :  कल्याण डोंबिवलीत कोरोनाने कहर केला असून आज देखील  एकाच दिवशी तब्बल ६२  रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकीदोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ६२  नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ६२  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १०९६ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला असून ३८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६८१  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 
 
आज आढळलेल्या या रुग्णांमध्ये कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील ३१, डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील २९, तर टिटवाळा येथील २ रुग्ण आहेत. टिटवाळा येथील ७० वर्षीय महिलेचा आणि कल्याण पश्चिमेतील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.