राज्यात कोरोना रूग्णांचा आलेख चढताच, लॉकडाऊनचा पुन्हा एकदा इशारा?, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५६,५२,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,९३,९१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२८,०६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज (शनिवार) राज्यात एकूण ६ हजार २८१ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत २ हजार ५६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील २४ तासांत ४८ हजार ४३९ इतके पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५६,५२,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,९३,९१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२८,०६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंध करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिममध्ये आजपासून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.