एक चुटकी सिन्दूर की कीमत.., बायकोच्या हाती चावी लागताच नवऱ्याची झाली पोलखोल

अनेक प्रकारच्या संशयी घेणाऱ्या मालिकेतल्या अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असाल. मग या गोष्टींचा पाठपुरवठा करून सत्य समोर येणं म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको... अशीच एक घटना महिलेसोबत घडली आहे. तसेच तिने आपल्या नवऱ्याची चोरी पकडली आहे.

मुंबई : नवरा घरी उशीरा येतो, तो कधीच फोन उचलतं नाही. आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीसोबत लफडं तर नसेल ना…अशा अनेक प्रकारच्या संशयी घेणाऱ्या मालिकेतल्या अभिनेत्री तुम्ही पाहिल्या असाल. मग या गोष्टींचा पाठपुरवठा करून सत्य समोर येणं म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको… अशीच एक घटना महिलेसोबत घडली आहे. तसेच तिने आपल्या नवऱ्याची चोरी पकडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं आधी लग्न झालं होतं, तिचा घटस्फोट झाला होता. आधीच्या पतीपासून तिला एक मूलही आहे. घटस्फोटानंतर ती ब्रँडन नावाच्या पुरुषाला भेटली. ब्रँडन श्रीमंत आणि स्मार्ट होता. परंतु मला एखाद्या राजकुमारीसारखं ठेवायचा. त्याला माझ्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र माझ्या आधीच्या नवऱ्याचा अनुभव आल्यानंतर मला कोणतंही नवं नातं जोडण्यासाठी घाई करायची नव्हती. त्यासाठी थोडा वेळ हवा होता. मी त्याच्याकडून एक वर्षाचा वेळ मागून घेतला. एक वर्षानंतर ब्रँडननं मला लग्नासाठी पुन्हा विचारलं. ब्रँडन माझ्या मुलीचीही नीट काळजी घ्यायचा. सर्वकाही एकदम परफेक्ट होतं. असं महिलेने सांगितले.

पुढे सांगितले की, पण इतरांना तो प्लेबॉय वाटायचा. माझे जवळचे मित्रमैत्रिणी मला त्याच्यापासून सतर्क राहण्याचा सल्ला द्यायचे. ३५ व्या वाढदिवशी मला तो सिंगापूरला हॉलिडेवर घेऊन गेला आणि तिथं त्यानं मला लग्नासाठी विचारलं. मी अखेर त्याला हो म्हटलं. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आम्ही दोघांनी लग्न केलं. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण होता. हनीमूनच्या दोन आठवड्यानंतर ब्रँडन काही कामानिमित्त शहराबाहेर गेला. काही दिवसांनी तो घरी परतला आणि महिलेसाठी गिफ्ट घेऊन आला. जेव्हा तो अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला तेव्हा मी त्याचं सामान आवरू लागली. त्याचे कपडे आवरत असताना जॅकेटच्या एका पाकिटातून एक चावी जमिनीवर पडली. मला वाटलं तो ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या रूमची चावी असेल. पण तिला चावीमागील सत्य ऐकून धक्काच बसला.

बायकोच्या हाती लागली एक चावी आणि…

महिला म्हणाली, ब्रँडननं मला खरंखरं सांगितलं. तो हॉटेलमध्ये एका महिलेला भेटायला गेला होता आणि घरी परतण्यापूर्वीदेखील तो तिलाच भेटला होता. मला यापुढे काहीच ऐकायचं किंवा बोलायचं नव्हतं. मी पूर्णपणे तुटले. हॉटेलच्या त्या एका चावीनं माझं लग्न मोडलं. मी त्याला घरातून बाहेर काढलं. माझा दुसरा नवराही तसाच निघाला. जर मी माझ्या मित्रमैत्रिणींचं ऐकलं असतं तर माझ्यावर ही वेळच आली नसती. हे नातं मला आनंद नाही तर एक चांगला धडा देऊन गेलं आहे.