udhav thackrey

मोठया प्रमाणावर लसीचा पुरवठा झाल्यास १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे सुरळीतपणे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे. सद्यस्थितीला केवळ सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. राज्य सरकारची एक रकमी पैसे देऊन लशी विकत घेण्याची तयारी असून आपल्याला १२ कोटी डोसाची आवश्यकता

  मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. उद्या (दि. १ मे) पासून जसजशा लशी उपलब्ध होतील तसतश्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे, त्यासाठी राज्य सरकारची एक रकमी पैसे देऊन लशी विकत घेण्याची तयारी असून आपल्याला १२ कोटी डोसाची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले आहेत. मात्र लसीकरणाच्या पुरवठ्यावर मर्यादा आहे. मे महिन्यात केंद्राकडून १८ लाख डोसेस मिळणार आहेत. पण लस मिळण्याची तारीख मिळालेली नाही. लसीकरणाची सुरुवात हळूहळू असली तरी कृपया गोंधळ उडू देऊ नका.लसीकरण केंद्रवरती कोणत्याही प्रकारची अनावश्यक गर्दी करण्याचे नागरिकांनी टाळावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

  लसीकरणाची सद्यस्थिती
  राज्यात आतापर्यंत १ कोटी ५८ लाखपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक ६,१५५ लसीकरण केंद्र ( ५३४७ शासकीय /८०८ खासगी )आहेत. केंद्राला विनंती की नोंदणी एप सर्व राज्यांना वेगवेगळे उपलब्ध करून घ्यावे म्हणजे एकाच यंत्रणेवर ताण येणार नाही. मोठया प्रमाणावर लसीचा पुरवठा झाल्यास १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे सुरळीतपणे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे. सद्यस्थितीला केवळ सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांकडे पाठपुरावा सुरु आहे.

  ३ एप्रिल रोजी एका दिवसांत ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. २६ एप्रिल रोजी राज्याने लसीकरणात ५ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण करून विक्रम नोंदविला. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांच्या कितीतरी पुढे आहोत.

  चाचण्याची सद्यस्थिती
  राज्यात दररोज २ लाख ७५ हजार चाचण्या. आणखी वाढवून ३ लाख करण्याचा प्रयत्न कसोशीने सुरु आहे. यात आरटीपीसीआर ६० टक्के आणि एन्टीजेन ४० टक्के आहे. आत्तापर्यंत राज्यात ६०९ प्रयोगशाळा असून राज्यातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या दर हळूहळू घसरण होत आहे.

  दुसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला ही बंधनं पाळण्याची आवश्यकता आहे. ही बंधनं लावणे सोपे आहे पण पाळणे अवघड आहे. नाईलाजाने आपली रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही असे मी म्हणालो होतो. काहींना वाटते की केंद्राने जे केलं त्याप्रमाणे आपण करायला हवं. कुणा आपल्यापेक्षा चांगलं काही केलं असेल, तर ते करायला मला काहीही वाटणार नाही. मी कुणाचंही अनुकरण करायला तयार आहे. पण हा सल्ला देताना खरंच आपल्या सरकारने काय केलं, हे आपण जाणून घेणं गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.