मुली ‘त्याला’ पसंत करत नाहीत म्हणून पठ्ठ्याने लिहिलंय थेट आमदारालाचं पत्र

एका तरणाांने मुली पटत नाहीत म्हणून चक्क आमदाराला पत्र लिहीलं आहे. मुली पटत नाही आणि भाव देत नाही त्यामुळे एका तरूणाने थेट आमदारांना पत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या पत्रातील लिहलेला मजकूर वाचून अनेकजण हसून हसून लोटपोट झाले आहेत. या पत्रावर सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रीया येत आहेत.

    मुंबई : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट समजली जाते. प्रेमाला वयाचं, काळाचं आणि रंगाचं बंधन नसतं. कोणाचं कधी कोणावर प्रेम होईल हे काही सांगता येत नाही. तर एकतर्फी प्रेमातून देखील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असतात. अनेकांचं एकतर्फी प्रेमही असतं.

    मात्र एका तरणाांने मुली पटत नाहीत म्हणून चक्क आमदाराला पत्र लिहीलं आहे. मुली पटत नाही आणि भाव देत नाही त्यामुळे एका तरूणाने थेट आमदारांना पत्र लिहिलं आहे.

    तरुणांने पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय?

    या पत्रात तरूणांने लिहीलं आहे की, सविनय विनंती याप्रमाणे आहे की, आपल्या संपुर्ण तालुक्यात भरभरून मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नसल्यानं ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेड्यागावाला असून दररोज राजूरा येथे दररोज फेरी मारतो. परंतु मला एकही मुलगी पटली नाही, असं या पत्रात तरूणानं लिहिलं आहे. दारू पिणाऱ्या लोकांना मुलगी असते, हे बघून माझा जीव जळून राख होतो. तरी माझी आपणास विनंती आहे की, विधानसभा क्षेत्रातील तरूणींना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आमच्यासारख्यांना भाव द्यायला सांगितलं पाहिजे, असं पत्र तरूणाने लिहिलं आहे.

    दरम्यान, सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या पत्रातील लिहलेला मजकूर वाचून अनेकजण हसून हसून लोटपोट झाले आहेत. या पत्रावर सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रीया येत आहेत.