दिशाहीन जाहिरातींच्या तक्रारींमुळे एएससीआय आता ३,००० डिजीटल प्लॅटफॉर्मवर ठेवणार अधिक लक्ष

मुंबई: ॲडर्व्हटायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) अंतर्गत मुद्रित व टीव्ही माध्यमातील संभाव्य दिशाहीन जाहिरातींवर लक्ष ठेवण्याचे काम नॅशनल ॲवडर्व्हटायझिंग मॉनिटरिंग सर्व्हिस (NAMS) करत असते, आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी टॅम मीडिया रीसर्च सोबत सहकार्य करार केला आहे. सुरुवातीला एएससीआय अन्न पदार्थ, पेय, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील डिजिटल माध्यमांवर लक्ष ठेवणार आहे. कारण गेल्या वर्षात या सर्व क्षेत्रांतून मिळून आलेल्या ७९% तक्रारींवर एएससीआयने कारवाई केली आहे. भारतातील जाहिरातींचा ८० टक्के खर्च ज्या क्षेत्रात केला जातो त्या क्षेत्रावर निरीक्षण ठेवायला एएससीआयसुरुवात करणार आहे.

एकूण मीडियावरील खर्चापैकी ३० टक्के खर्च डिजिटल जाहिरातींवर केला जातो आणि तो दिवसेंदिवस वाढतच आहे, कारण ही काळाची गरज आहे. सर्च इंजिनपासून व्हिडिओ साइट्स, न्यूज पोर्टल्स आणि खगोलशास्र, ऑटोमोबाईल्ससारख्या विषयांना वाहिलेल्या वेबसाइट्स अशा विविध प्लॅटफॉर्मचा यात समावेश आहे.एएससीआयने ज्यावर ग्राहकांना विश्वास ठेवता येईल अशा उच्च दर्जाच्या दर्जेदार जाहिराती दाखवल्या जाव्यात यासाठी कायमच आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यातच वाढ करून आता संस्था नैसर्गिकपणे अधिक जबाबदारी उचलत आहे.

एएससीआयचे अध्यक्ष रोहित गुप्ता म्हणाले,“आपण सध्या अशा जगात राहतोय जे दिवसेंदिवस अधिकच डिजिटल होत चालले आहे. त्यामुळेच या प्लॅटफॉर्मवरून मार्केटिंगचे प्रमाण वाढत आहे. एक स्वायत्त संस्था म्हणून आम्ही ऑफलाइन स्पेसमध्ये करत असलेल्या निरीक्षणामध्ये आम्हाला ऑनलाइन स्पेसचा समावेश करून घ्यायला हवा. इतक्या कसोशीने व सातत्याने जाहिरातींवर लक्ष ठेवणारी एएससीआयही जगातील एकमेव स्वायत्त संस्था असेल असा मला विश्वास वाटतो. टॅम व्यतिरिक्त कोणत्याही भागीदाराचा आम्ही विचारच केला नाही कारण नीती नियमांचे पालन करून जाहिरातींवरील ग्राहकांचा विश्वास वाढवण्याच्या आमच्या कामामध्ये टॅमची प्रतिमा आणि त्यांचा मोठा अनुभवच आम्हाला उपयोगी पडणार आहे.”