‘सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा…’, आशिष शेलार मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर बरसले

पावसाळ्यापुर्वीची कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच मुंबई महापालिकेने केला होता.मात्र तो आता फोल ठरला आहे. आमदार ॲड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (Ashish Shelar Tweet) दोन ट्विटच्या माध्यमातून त्यांनी निशाणा साधला आहे.

    मुंबईमध्ये(Mumbai) मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. मात्र पाऊस सुरु झाल्या झाल्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापुर्वीची कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच मुंबई महापालिकेने केला होता.मात्र तो आता फोल ठरला आहे. आमदार ॲड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (Ashish Shelar Tweet) दोन ट्विटच्या माध्यमातून त्यांनी निशाणा साधला आहे.

    एका ट्विटमध्ये त्यांनी ‘डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात…आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात! असे म्हणत टीका केली आहे.

    दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबल आहे. लोकांच्या घरात पाणी घुसू लागल आहे. नालेसफाई कधी १०७% तर कधी १०४%… झाल्याचे दावे केले जातात.  पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे झाले आहेत.

    पुढे ते म्हणतात, मुंबईकर हो!सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!!

    दरम्यान मुंबईत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. पावसात मुंबईकरांचे हाल व्हायला पुन्हा सुरुवात झाली आहे.