ashish shelar

मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक असल्याचे ट्विट आमदार आशिष शेलार यांनी केले आहे.

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी(metro carshade issue) आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होत असल्याचे समजते.  मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. यावरून आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार(ashish shelar) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर, एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय.”

“मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक.” असंही ते म्हणाले.