aashish shelar

कोरोना नियमांचे उल्लंघन करून बार आणि पब बेकायदेशीरपणे(bar and pub illegally working) सुरु आहेत, हे लाजिरवाणं आहे. कोरोना सक्रीय आहे. मुंबईकर मरत आहेत. मुख्यमंत्री दरररोज जबाबदारीने वागा आणि घरात राहा, असे सांगत आहेत. मग बीएमसीला बार आणि पबवर नाईट कर्फ्यू लावण्यापासून कोण रोखत आहे? पब/पार्टी गँग ही मुख्यमंत्री/बीएमसी पेक्षा जास्त शक्तीशाली आहे का? असा प्रश्न आशिष शेलार(ashish shelar यांनी विचारला आहे.

अनलॉकच्या टप्प्यात मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत मुंबईतील ‘नाइट क्लब’(night club in Mumbai) रात्रभर सुरु होते. या धिंगाण्यामुळे कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंंगचे सगळे नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी गर्दी जमत असल्याचे पालिकेच्या छाप्यात समोर आले आहे. कोरोना निर्बंधांचे पालन होत नाही. त्यामुळे मुंबईत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करावी, अशी शिफारस पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार(ashish shelar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बार, पबमुळे कोरोना वाढला.. आता नशा उतरली..? पालिकेला नाईट कर्फ्यू लावायची वेळ आली. पब, पार्टी गँगने वेळ वाढवून मागितली होती…या गँगला आता जबाबदार धरणार का? मुख्यमंत्री आरोग्याचे आवाहन करतात..तर पब, पार्टी गँग अनधिकृतपणे धिंगाणा घालतात! ही गँग मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी आहे का?”

कोरोना नियमांचे उल्लंघन करून बार आणि पब बेकायदेशीरपणे सुरु आहेत, हे लाजिरवाणं आहे. कोरोना सक्रीय आहे. मुंबईकर मरत आहेत. मुख्यमंत्री दरररोज जबाबदारीने वागा आणि घरात राहा, असे सांगत आहेत. मग बीएमसीला बार आणि पबवर नाईट कर्फ्यू लावण्यापासून कोण रोखत आहे? पब/पार्टी गँग ही मुख्यमंत्री/बीएमसी पेक्षा जास्त शक्तीशाली आहे का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.

मुंबईतील ‘नाइट क्लब’मध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या क्लबमध्ये हजारो लोक जमत आहेत. तसेच हे क्लब पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतात. महानगरपालिकेने लोअर परळ येथील तोडी मिल कपाऊंडमधील ‘एपिटोम क्लब’मध्ये तसेच वांद्रे येथील एका क्लबवर धाडी टाकल्या असता ही बाब उघडकीस आल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले आहे.