ashish shelar-uddhav thakre

आशिष शेलारांनी म्हटले आहे की, बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा करण्यात आला. तरीही आम्ही निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो परंतु अहंकार होता. त्यामुळे ऐकले नाही. आखेर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. अशा आशयाचे ट्विट आशिष शेलारांनी केले आहे.

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा (Final year exams) रद्द होणार नाहीत, तसेच परिक्षेची तारिख बदलता येईल परंतु परिक्षा रद्द करता येणार नाहीत असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. परीक्षा होणारच मात्र त्यांच्या तारखा ठरविण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना देण्यात आला आहे. युजीसी ने ठरविलेल्या तारखांना परीक्षा घेता येणार नसेल तर युजीसी (UGC) सोबत चर्चा करुन नव्या तारखा ठरवण्यात याव्यात आणि जाहीर कराव्यात असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निर्णयावरुन विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. (Ashish Shelar criticizes state governmen)

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आशिष शेलारांनी ट्विट करत म्हटले आहे की, कुलपती म्हणून राज्यपालांना आणि कुलगुरुंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकवून लावली युजीसीला जुमानले नाही. तसेच मंत्रिमंडळात याबाबत चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना वेठीस धरले. त्यामुळे अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान झाले आहे. हे सगळे करुन काय साध्य केले असा सवाल भाजपा नेते आशिष शेलारांनी केला आहे.

आशिष शेलारांनी म्हटले आहे की, बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा करण्यात आला. तरीही आम्ही निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो परंतु अहंकार होता. त्यामुळे ऐकले नाही. आखेर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. अशा आशयाचे ट्विट आशिष शेलारांनी केले आहे.

सरकार स्वतःच्याय अहंकाराने स्वतःच्या तोंडावर पडले आहे. तसेच भाजपा नेते आशिष शेलारांनी विद्यार्थ्यांना खचून जाऊ नका आणि परिस्थितीला धैर्याने सामोरे जा असे आवाहन केले आहे. तुमचे भविष्य उज्ज्वल असून यश तुमच्या वाट्याला नक्की येईल असे म्हटले आहे.