devendra fadanvis

नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले होते. तर दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता, मात्र पाचही जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला.

मुंबई : विधानपरिषदेवरील  पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजप नेते माजी मंत्री आशिष शेलार रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पुणे, औरंगाबाद, आणि विदर्भातील पराभवाच्या कारणांचा शोध पक्षाकडून घेतला जाणार आहे. आशिष शेलार विदर्भातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील पराभवाची कारणे शोधणार आहेत. रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांना औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्रीय  स्तरावरून आदेश

आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना केंद्रीय स्तरावरून स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पराभवाची कारणे शोधण्यासा सांगण्यात आले आहे. त्यानंतर औरंगाबाद, विदर्भ, पुण्याच्या पराभावाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवतील.

नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले होते. तर दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता, मात्र पाचही जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला.

पुणे पदवीधर: अरुण लाड (राष्ट्रवादी)

पुणे शिक्षक : जयंत आसगावकर (काँग्रेस)

नागपूर पदवीधर: अभिजीत वंजारी (काँग्रेस)

औरंगाबाद पदवीधर: सतीश चव्हाण (राष्ट्रवादी)

अमरावती शिक्षक: किरण सरनाईक (अपक्ष)

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य : अमरिश पटेल (भाजप)