खासदार संजय राऊतांना अंतर्गत शत्रूपासूनच धोका – शेलार

खा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय.. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असवा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला याबाबत विचारल्या प्रश्नावर त्यांनी लगावला.

    मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना- राणे वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य करत खा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय.. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असवा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला याबाबत विचारल्या प्रश्नावर त्यांनी लगावला.

    संजय राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते, त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सामनातून राणे कुंटुबियांचा चांगला समाचार घेत, बोचरी टीका केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा संजय राऊत यांना जसाच तसे उत्तर दिले होत. ही सर्व पाशर्वभूमी पाहता आता खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेता वाढ करण्यात आली आहे