aashish shelar

का पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी शेलार यांनी जाहीरपणे मांडलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे नावही चर्चेत आले होते. त्यामुळे शेलार यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.

पुणे : कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, ही ज्ञानेश महाराव यांच्या वाक्यावर टिप्पणी होती. आमचे सरकार आले तर देवेंद्र फडणवीसच(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतील, असा खुलासा  भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.

‘एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. तसं झालं तर माझ्यासारख्या माणसाचंही त्याला समर्थन असू शकतं,’ असे जाहीर वक्तव्य शेलार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर केले होते. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी शेलार यांनी जाहीरपणे मांडलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे नावही चर्चेत आले होते.

त्यामुळे शेलार यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. आमचे सरकार आले तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असा खुलासा  करत त्यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.