अ‍ॅड. आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलावर केला कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होऊन जास्त कालावधी झाला. या काळात भाजपाचे नेते (BJP ) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नेते एकमेकांच्या पक्षातील नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं प्रत्यक्ष दिसून आलं आहे. पण याचदरम्यान भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला.

काय म्हणाले आशिष शेलार ?

निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी एक महत्त्वाचे सागरी संशोधन केले. त्यावरून शेलार यांनी त्याची पाठ थोपटली. उर्जावान तेजस ठाकरेंचे नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन ! करोनकाळात देखील ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पढली, हे कौतुकास्पद ! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा!

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर आशिष शेलार यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांवर टीका केली. पण आज मात्र त्यांनी उद्धव यांचा धाकटा सुपुत्र तेजस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचं दिसून आलं.