‘युरेका.. हाच तिघाडीचा किमान समान कार्यक्रम’ – पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत नोटा सापडल्यावर आशिष शेलारांचे टीकास्त्र

NIA ने मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे(sachin waze) यांना ताब्यात घेतल्यामुळे, तपासाला वेगळ वळण लागल्याचं दिसून येत आहे. रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलार(ashish shelar) यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी(mukesh ambani) यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आढळल्यापासून राज्याचं राजकारण तापत चाललं आहे. दरम्यान विधानसभा अधिवेशनात भाजपचे नेते या प्रकरणावर आक्रमक झाले होते. राज्य सरकारला नेमकं काय लपवायच आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी केला आहे. NIA ने मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे(sachinwajhe) यांना ताब्यात घेतल्यामुळे, तपासाला वेगळ वळण लागल्याचं दिसून येत आहे. रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

    पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत लाखोंच्या नोटा आणि नोटा मोजायची मशीन सापडली आहे. एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती तो तिघाडीचा किमान समान कार्यक्रम हाच का तो? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटक आढळल्याप्रकरणी मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी NIA ने तपासासाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान एक मर्सिडीज NIA हाती लागली आहे. मर्सिडीज गाडीच्या डीक्कीमध्ये पाच लाखांची रोकड, नोटा मोजण्याची मशीन, पिशवीत चेक्सचा शर्ट, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. तसेच या गाडीमध्ये जी नंबरप्लेट सापडली आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. ही मर्सिडीज गाडी सचिन वाझेचं वापर असल्याची माहिती समोर आली आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांनीही मृत्यूपूर्वी याच गाडीतून प्रवास केला होता, असे समजते.