पोस्टल कॉलनी नाल्याची आशिष शेलार यांनी केली पाहणी

विक्रोळी: घाटकोपर सायन मार्गावरील पोस्टल कॉलनी ते सिद्धार्थ कॉलनीजवळ असलेल्या मुख्य नाल्याची पाहणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज केली. पोस्टल कॉलनी, सिध्दार्थ कॉलनी, बीएआरसी कॉलनी व माँ

 विक्रोळी: घाटकोपर सायन मार्गावरील पोस्टल कॉलनी ते सिद्धार्थ कॉलनीजवळ असलेल्या मुख्य नाल्याची पाहणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज केली. पोस्टल कॉलनी, सिध्दार्थ कॉलनी, बीएआरसी कॉलनी व माँ रुग्णालय आणि टेम्बे पुलाखालील पाणी जाण्याकरिता एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी पोस्टल कॉलनी ते सुमननगर पर्यंत नाला बांधला. मात्र अद्यापही या परिसरातील पावसाळी साचत असलेल्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आजही पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांप्रमाणे वाहनचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

घराघरात दरवर्षी पाणी जात असल्याने घरातील वापरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान नागरिकांना सोसावे लागत आहे.या नागरिकांनी नगरसेविका आशा मराठे यांना तोडगा काढण्यास विनंती केली असता आज या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या नाल्याची पाहणी भाजप माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली. तसेच तेथीस नागरिक व नगरसेविका आशा मराठे यांच्या बरोबर चर्चा केली.