aashish shelar

महाराष्ट्र (Maharashtra) हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (Chief Minister Uddhav Thackeray) धोरण असल्याचं शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. यावरून भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टोला लगावला आहे.

मुंबई: निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारल्यानंतर आता या मुद्यावरून भाजपाने (BJP) शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (Chief Minister Uddhav Thackeray) धोरण असल्याचं शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. यावरून भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टोला लगावला आहे.

वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलीसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया.. पण, “इथे कायद्याचे राज्य” आहे ना? कि एका बबड्याच्या फायद्याचे? असा टोला आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

वयोवृद्ध माजी नौदल अधिकाऱ्याला सहा-सात जणांनी मिळून केलेली मारहाण जनतेला भुरट्या गुंडांचा ‘षंढपणा’ वाटत असली तरी शिवसेनेच्या प्रवक्त्याना मात्र ती ‘संतप्त व उत्स्फूर्त’ प्रतिक्रिया वाटते आहे. विश्वास ठेवा हा ठाकरे सरकार पुरस्कृत दहशतवाद एक दिवस जनताच पूर्ण ताकदीने ठेचून काढेल, अशा शब्दांत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.