aashish shelar

माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत. असे म्हणत भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विरोधकांवर (state government) निशाणा साधला आहे.

मुंबई : देशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने (Central Government) पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Farmers Bill) आंदोलन छेडले आहे. मागील १५ दिवसांपासून पंजाब हरियणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना आता देशातून विविध भागांतून समर्थन मिळाले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज भारत बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनाला सर्व विरोधकांनी पाठींबा दिला आहे. यावर विरोधी पक्ष नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारवर (state government)  निशाणा साधला आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत देशातील शेतकऱ्यांना सल्ला देत राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला?, कोणी शेतकऱ्यांना फसवलं?, कोणी कामगारांना उध्वस्त केल?, कोणी मालकांचे फायदे करुन दिले? त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत. असे म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असतानाच्या काळात महाराष्ट्रात शेतीविषयक कायद्यात सुधारणा करण्यात आली. आता त्याच सुधारणा देशपातळीवर करण्यात आल्या आहेत. तर याला विरोध का?, काँग्रेसने जे केले त्या विरोधात भारत बंद केला. त्यामुळे काँग्रेसच्या फसवणूकीला देशातील शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असेही भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.