ashok chavan says stop trying mislead maratha community

  • आज दुपारी ४ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत होणार बैठक

मुंबई : काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची (maratha community) दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर(social media) प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत असून त्यापासून समाजाने सावध राहावे असे आवाहन मराठा आरक्षणा (maratha reservation) संदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केले आहे.

या उपसमितीची बैठक गुरुवारी झाली. बैठकीला चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पयार्यांवर विचारविनिमय झाला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिघी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी ४ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे.

अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम आहे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये व कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.काही मंडळींनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्या जात आहेत. चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहे. मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केले जाते आहे. समाजाने हे षडयंत्र ओळखण्याची व हाणून पाडण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मराठा क्रांती मोर्चाची बैठक (maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची (maratha kranti morcha) बैठक शुक्रवारी मुंबईत होणार आहे. महत्त्वाचे पदाधिकारी व सर्व जिल्हा समन्वयक बैठकीला उपस्थित राहतील.