Congress leader in the maharashtra is angry after the pushback to Rahul Gandhi

चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. मराठा आरक्षण टिकावे म्हणून महाविकास आघाडीने प्रयत्न सोडलेले नाहीत. ज्यांच्या काळात कायदा आला ती भाजप मात्र प्रयत्न सोडून मोर्चाचे इशारे देते आहे. दोघांमधील फरक स्पष्ट आहे आणि हेतूही स्पष्ट आहे. हातात हात घालून काम केले तर अजूनही वेळ गेलेली नाही. बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

    मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या मोर्चात भाजपही सामिल झाला आहे. त्यावरून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका करणारे व्टिट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आम्ही आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजप मोर्चे काढत आहे. बघू आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे.

    फरक आणि हेतूही स्पष्ट