मराठा आरक्षणवरून अशोक चव्हाणांचा विनायक मेंटेना टोला  

    मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच तापत असल्याचे  पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या ५ जून रोजी मोर्चा काढण्याची भूमिका  शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे घेतली. त्याच्या या भूमिकेवरून आता अशोक चव्हाण  त्यांना टोला लगावला आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
     मराठा आकलन कालावधी दरम्यान ज्या युवकांची निवड झाली आणि काही नियुक्त्या रखडल्या आहेत त्यातवर बैठकीत आज चर्चा झाली. विनायक मेटे आणि संभाजी राजे यांच्या भूमिकेत फरक आहे. संभाजी राजे समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विनायक मेटे यांची भूमिक राजकीय असल्याचे  दिसत  असल्याचा टोला अशोक  चव्हाणांनी लगावला आहे.
     तसेच मोर्चा काढण्याच्या मेटेंच्या विधानावर अशोक चव्हाण यांनी  ‘ स्त्यावर उतरण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी. भाजप मुद्दाम आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी भाजण्याचे काम करू पाहत आहे  असाही टोला लगावला आहे.