मुंबईत कोरोनाचा नवा स्ट्रेन येत आहे. अधिवेशन असे या नव्या कोरोनाचे स्ट्रेनचे नाव आहे. तो तुमच्या शरीरावर हल्ला करत नसला तरी तुमच्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून केलीय. राज्याचे अधिवेशन एका आठवड्यावर आले असताना मनसेची भूमिकाच एक प्रकारे यातून समोर येत आहे.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जातायत. या अधिवेशनावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कडाडून टीका केलीय.
मुंबईत कोरोनाचा नवा स्ट्रेन येत आहे. अधिवेशन असे या नव्या कोरोनाचे स्ट्रेनचे नाव आहे. तो तुमच्या शरीरावर हल्ला करत नसला तरी तुमच्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून केलीय. राज्याचे अधिवेशन एका आठवड्यावर आले असताना मनसेची भूमिकाच एक प्रकारे यातून समोर येत आहे.
सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021
शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेनं ती स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे राजकीय निरीक्षकांचं मत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी आतापासूनच मनसेनं सुरू केली असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत.
हिंदुत्ववादी पक्ष ते सेक्युलर पक्ष असा शिवसेनेचा प्रवास असून मनसे आता मराठीच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे येऊ शकते, असा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्यााचा निर्णयदेखील याच चष्म्यातून पाहिला जात आहे. सरकारी धोरणांवर आसूड ओढत पुन्हा एकदा प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यासाठी मनसेनं कंबर कसल्याचं दिसून येतंय.