जळगाव वसतिगृह प्रकरणावरून विधानसभेत खडाजंगी ; २ दिवसांत अहवाल देण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत आहेत. या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी आज २ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    मुंबई : जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पहायला मिळाली. यावेळी या प्रकरणावर चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

    जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत आहेत. या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी आज २ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.विधानसभेत या प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार संतापले. मुनगंटीवार म्हणाले, सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,असे म्हणत त्यांनी आता राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.परंतु, राष्ट्रपती राजवाटीच्या मागणीनंतर सत्ताधारी संतप्त झाले.

    दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शासकीय वसतिगृहात पोलिस हे महिलांना चौकशीच्या नावाखाली नाचवित असल्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे, असे ते म्हणाले.