udhhav thackeray

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, वाह प्रशासन! बार आणि दारुची दुकाने सुरु आहेत. मग मंदिरे डेंजर झोनमध्ये आहे का? नियमावली लागू करण्यामध्ये काही जण असमर्थ ठरतात, तर त्यांना त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे (Temple) बंद ठेवण्यात आली आहेत. ती आता पुन्हा खुली करावी अशी मागणी विरोधक आणि भाविक करत आहेत. परंतु ठाकरे सरकार (Thackeray Government) मंदिरे खुली न करण्यावर ठाम आहे. मंदिर खुली करावी अशी सुचना देणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat sing Koshyari) यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न केला होताय त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे म्हटले होते. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, वाह प्रशासन! बार आणि दारुची दुकाने सुरु आहेत. मग मंदिरे डेंजर झोनमध्ये आहे का? नियमावली लागू करण्यामध्ये काही जण असमर्थ ठरतात, तर त्यांना त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते, अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसनेकडून काय उत्तर मिळते. हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे.